प्रभाग १९ मध्ये आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
प्रभाग १९ मध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व स्वच्छता दूतांचा सन्मान,आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
पनवेल ता. 10(प्रतिनिधी) आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक १९ च्या वतीने विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रभागातील विविध भागांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यासह वृक्षारोपण, हायमास्टचे लोकार्पण आणि स्वच्छता दूतांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लाईन आळी विभागात नगरसेविका दर्शना भोईर यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी परिसरातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला. मोमीन पाडा आणि रोहिदास वाडा परिसरात नगरसेवक राजू सोनी व प्रभाग अध्यक्ष पवन सोनी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मिडल क्लास सोसायटी परिसरात नगरसेवक तथा भाजपा पनवेल शहराध्यक्ष सुमित उल्हास झुंजारराव यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान घेण्यात आले. त्यानंतर मिडल क्लास सोसायटी ग्राउंडवर वृक्षारोपण करण्यात आले. तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या व सुविधेच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या हायमास्टचे लोकार्पण करण्यात आले. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान देणाऱ्या स्वच्छता दूतांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास आमदार प्रशांतदादा ठाकूर, महापौर नितीनभाई पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपा नेते परेश ठाकूर, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेविका रेनुका मोहोकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवदास कांबळे, शहर चिटणीस रूपेश नागवेकर, युवा मोर्चा अध्यक्ष हिमेश बहिरा यांच्यासह उद्योजक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.“स्वच्छ प्रभाग • सुंदर प्रभाग • हरित प्रभाग” या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

संपादक : नितीन जाधव





