आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा सांस्कृतिक सोहळा; महापौर नितीन पाटील यांच्या वतीने सुरेल शुभेच्छा
‘ऋतू हिरवा’च्या सुरेल मैफलीने पनवेलकर मंत्रमुग्ध
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा सांस्कृतिक सोहळा; महापौर नितीन पाटील यांच्या वतीने सुरेल शुभेच्छा
पनवेल | प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जाणीव एक सामाजिक संस्था’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘ऋतू हिरवा’ हा आगळावेगळा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पनवेल महानगरपालिकेचे महापौर तथा जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन पाटील यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संगीत, कला आणि सांस्कृतिक सादरीकरणाची सुरेल मेजवानी या कार्यक्रमातून पनवेलकरांना अनुभवता आली. विविध सांगीतिक सादरीकरणांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी आवर्जून भेट देत कलाकारांचे कौतुक केले तसेच उपस्थित नागरिकांचे आभार मानले. वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. महापौर नितीन पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र आणण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला. ‘ऋतू हिरवा’ या कार्यक्रमामुळे पनवेलच्या सांस्कृतिक वातावरणात उत्साहाचे रंग भरले असून, कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमाला माजी खासदार रामशेठ ठाकूर, अविनाश कोळी, जे एम म्हात्रे, प्रीतम म्हात्रे, ममता म्हात्रे, प्रकाश बिनेदार, सुमित झुंजारराव यांच्यासह नगरसेवक कार्यकर्ते व प्रेक्षक उपस्थित होते.सामाजिक बांधिलकीसोबतच कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून स्वागत करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त झालेला हा सुरेल सोहळा पनवेलकरांच्या स्मरणात राहणारा ठरला.

संपादक : नितीन जाधव





