उद्योगसामाजिक

कळंबोली वसाहती मधील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे रहिवाशांकडून आभार


कळंबोली वसाहती मधील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे रहिवाशांकडून आभार

प्रेम डांगे / कळंबोली प्रतिनिधी

कळंबोली (प्रतिनिधी):पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक ८ मधील के.एल.२ सेक्टर ५ परिसरात कचरा साचणे तसेच ड्रेनेज लाईन बंद होण्याच्या समस्येमुळे रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी नगरसेवक रामदास शेवाळे यांच्याकडे निवेदन देऊन तक्रार नोंदवली.

नागरिकांच्या अडचणीची गंभीर दखल घेत नगरसेवक शेवाळे यांनी तात्काळ पनवेल महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यांच्या पुढाकारामुळे प्रशासनाने कोणताही विलंब न करता के.एल.२ परिसरात स्वच्छता मोहीम राबवली तसेच ड्रेनेज लाईन दुरुस्तीचे कामही तत्काळ सुरू करण्यात आले.

सध्या या भागात साफसफाई आणि ड्रेनेज दुरुस्तीची कामे वेगाने सुरू असून त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक रहिवाशांनी नगरसेवक शेवाळे यांच्या तत्परतेचे कौतुक करत मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

या तातडीच्या कारवाईमुळे परिसरातील स्वच्छता सुधारण्यास मदत होणार असून भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी प्रशासनाने नियमित देखरेख ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *