पनवेल महानगरपालिकेत महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन समारंभ उत्साहात
पनवेल महानगरपालिकेत महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन समारंभ उत्साहात
पनवेल, दि. १ : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आज १मे रोजी पनवेल महानगरपालिकेत ध्वजवंदनाचा समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सकाळी ७.०० महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला.
या कार्यक्रमास आयुक्त मंगेश चितळे, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते ॲङ प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे तसेच महापालिका सदस्य , अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, सहायक संचालक (नगररचना)केशव शिंदे,उपायुक्त डॉ वैभव विधाते, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, उपायुक्त मंगला माळवे, उपायुक्त स्वरूप खारगे, उपायुक्त अभिषेक पराडकर, शहर अभियंता संजय कटेकर , सहायक आयुक्त डॉ.रुपाली माने, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.तसेच विविध मान्यवर, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना महापौर नितीन पाटील म्हणाले, ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्याने देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिले आहे तसेच योगदान पनवेल महानगरपालिका महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि प्रगती मध्ये देत राहील असा मला ठाम विश्वास वाटतो.यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमाच्या वेळी रायगड सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी संचलन करत ध्वजाला मानवंदना दिली.
*हुतात्मा स्मारक येथे ही महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन*
पनवेल येथील हुतात्मा स्मारक येथे आज स्वातंत्र्य सैनिकाचे उत्तराधिकारी अनिल वासुदेव आचार्य यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
या कार्यक्रमास महापौर, आयुक्त यांच्यासह महापालिकेचे लोकप्रतिनिधी व अधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. तसेच स्वातंत्र्यसैनिकांचे उत्तराधिकारी ,विविध मान्यवर, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक : नितीन जाधव





