उद्योग

कळंबोली बसस्टॉपवरील वाहतूक नियंत्रकाच्या सतर्कतेमुळे महिलेची सोन्याची बॅग सुखरूप परत


कळंबोली बसस्टॉपवरील वाहतूक नियंत्रक यांच्या सतर्कतेमुळे महिलेची सोन्याची बॅग सुखरूप परत

प्रामाणिकपणाबद्दल नितीन भारती यांचा कळंबोली पोलिसांकडून सत्कार

कळंबोली, ता.10 (बातमीदार) : कळंबोली बस स्टॉप येथे एका महिलेची सोन्याचे दागिने असलेली बॅग विसरल्याची घटना घडली होती. मात्र बसस्टॉप नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले नितीन भिकू भारती यांच्या सतर्कतेमुळे ही बॅग संबंधित महिलेला सुखरूप परत मिळाल्याने प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षतेचे उदाहरण समोर आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी नितीन भारती यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे

मिळालेल्या माहितीनुसार, कमरजहा मोहम्मद रफीक शेख (वय 38 वर्षे) या महिला कळंबोली बस स्टॉप परिसरात प्रवासादरम्यान आपली सोन्याचे दागिने असलेली बॅग विसरून गेल्या होत्या. काही वेळानंतर ही बॅग बसस्टॉप परिसरात आढळून आली. त्या वेळी नियंत्रण कक्षात काम करणारे श्री. नितीन भारती यांनी तत्परता दाखवत बॅग सुरक्षित ताब्यात घेतली व संबंधित महिलेशी संपर्क साधून ती परत देण्याची कार्यवाही केली.

महिलेची मौल्यवान बॅग सुरक्षित परत मिळाल्याने त्यांनी श्री. भारती यांचे आभार मानले. या प्रामाणिकपणाबद्दल आणि सतर्कतेबद्दल कळंबोली पोलीस स्टेशनच्या वतीने एपीआय डफळ सर तसेच पोलीस हवालदार हराळे सर यांच्या हस्ते श्री. नितीन भारती यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी उपस्थितांनी श्री. भारती यांच्या कार्याचे कौतुक करत समाजात अशा प्रामाणिक व्यक्तींची गरज असल्याचे मत व्यक्त केले.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *