सामाजिक

शिवसेना शहर प्रमुख तुकाराम सरक यांचे जनसंपर्क कार्यालय ठरतेय ‘ जनसेवा केंद्र ’; प्रभागातील नागरिकांचा वाढता राबता 


शिवसेना शहर प्रमुख तुकाराम सरक यांचे जनसंपर्क कार्यालय ठरतेय ‘ जनसेवा केंद्र ’; प्रभागातील नागरिकांचा वाढता राबता                                                                              कळंबोली दि.8 ( प्रतिनिधी)  शिवसेना शहर प्रमुख तुकाराम सरक यांचे जनसंपर्क कार्यालय सध्या प्रभागातील नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने ‘लोकस्नेही केंद्र’ ठरत आहे. नागरिकांच्या विविध समस्या, मागण्या आणि अडचणी सोडवण्यासाठी सरक यांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात लोकांचा ओघ वाढत असून, या कार्यालयाचे कार्य आणि लोकांशी असलेला जिव्हाळा विशेष कौतुकास्पद मानला जात आहे. या जनसंपर्क कार्यालयातूनच प्रभागातील नागरिकांच्या अनेक प्रलंबित समस्या त्वरित आणि प्रभावीपणे सोडविल्या जात आहेत. पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवे, रस्ते, स्थानिक सुविधा या दैनंदिन विषयांपासून ते सामाजिक उपक्रमांपर्यंत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सरक यांनी आपली टीम सतत कामाला लावली आहे. त्यामुळे नागरिकांचा या कार्यालयावर वाढता विश्वास आणि सातत्याने होणारा राबता स्पष्टपणे दिसून येतो. तुकाराम सरक यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये युवकांची भक्कम फौज उभी राहिली आहे. प्रभागातील प्रत्येक छोट्या-छोट्या समस्येवर वेगाने प्रतिसाद देणे, तसेच स्थानिक पातळीवरील उपक्रम राबविण्यात हे युवा कार्यकर्ते सक्रिय आहेत. त्यामुळे सरक यांची टीम प्रभागात एक मजबूत संघटनात्मक शक्ती म्हणून उदयास येत आहे.

■याच जनसंपर्क कार्यालयातून तुकाराम सरक यांच्या सुविद्य पत्नी सायली ताई सरक यांच्या हिरकणी सामाजिक संस्थेचे कामकाजही सुरू आहे. महिला वर्गासाठी विविध उपक्रम, मार्गदर्शन सत्रे, आरोग्य जनजागृती, सक्षमीकरण कार्यक्रम यांमुळे हिरकणी संस्थेने महिलांचा विशेष विश्वास जिंकला आहे. परिणामी, सामाजिक कार्य आणि नागरिकसेवा या दोन्ही क्षेत्रांमध्ये या कार्यालयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वसाधारण नागरिक, महिला वर्ग, तसेच युवक या सर्व घटकांचा वाढता सहभाग आणि विश्वास लक्षात घेतल्यास तुकाराम सरक यांचे जनसंपर्क कार्यालय प्रभागातील एक प्रभावी आणि लोकाभिमुख केंद्र म्हणून मजबूतपणे उभे राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *