सामाजिक

तहसीलदार विजय तळेकर यांची एमआयडीसीत महाव्यवस्थापक प्रतिनियुक्ती


तहसीलदार विजय तळेकर यांची एमआयडीसीत महाव्यवस्थापक प्रतिनियुक्ती

नवी मुंबई : (प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार तहसीलदार विजय शिवाजीराव तळेकर यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), मुंबई येथे महाव्यवस्थापक (विशेष प्रकल्प) या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. हा आदेश ९ एप्रिल २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.

महसूल व वन विभागाच्या शिफारशीवरून ही नियुक्ती करण्यात आली असून, संबंधित नियम व अटींनुसार त्यांची सेवा उद्योग विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. ही प्रतिनियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.

पनवेल येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असताना विजय तळेकर यांनी अत्यंत प्रभावीपणे कार्यभार सांभाळत प्रशासनात वेगळी छाप निर्माण केली होती. त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांचा ठसा आजही पनवेलकरांच्या मनामध्ये कायम आहे. महसूल खात्यातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध नामांकित संस्थांकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

मितभाषी व मनमिळावू स्वभावामुळे ते नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरले होते. त्यांच्या या नियुक्तीची बातमी समोर येताच पनवेल तालुक्यातील नागरिकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. माझ्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत राज्याच्या औद्योगिक विकासाला गती देणे हेच माझे ध्येय राहील,अशी प्रतिक्रिया विजय तळेकर यांनी व्यक्त केली.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *