प्रभाग क्रमांक 7 मधील युवकांचा शिवसेनेमधील प्रवेश श्रीकांत फाळके यांची ताकद वाढवणारा
प्रभाग क्रमांक 7 मधील युवकांचा शिवसेनेमधील प्रवेश श्रीकांत फाळके यांची ताकद वाढवणारा
पनवेल ता.1( प्रतिनिधी) शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली ता. 30 रोजी प्रभाग क्रमांक सात मधील शेकडो युवकांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला.
पनवेल आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत पक्ष प्रवेश सुरू आहेत.जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली मागिल काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होत आहेत. आगामी पनवेल महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिने हे पक्ष प्रवेश पनवेल मध्ये शिवसेनेला बळकटी देत असल्याचे बोलले जात आहेत होत कळंबोलीत शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांनी प्रवेश करून पक्षाची ताकद अधिक सक्षम केली. कळंबोली शहर संघटक श्रीकांत फाळके यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून प्रभाग क्र.7 मधील अनेक उत्साही तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला.
कळंबोली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात साहेबप्रीत सिंग जौरा, स्वराज फडताडे, कार्तिक अधिक, दैविक शिंदे, विघ्नेश काटकर, शुभम, शत्रुधन, ओंकार लावंड यांच्या सहर्ष करून अनेक तरुणांनी लय दिवस झाले भगवा खांद्यावर घेतला
या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपतालुका संघटक महेंद्र पवार, कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, शहर संघटक श्रीकांत फाळके, उपशहर प्रमुख आनंदा माने, संजय शेडगे, दीपक कोडावते, सुमित सूर्यवंशी, श्रीकांत कदम, कुमार नलावडे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिक्रिया कळंबोली प्रभाग क्रमांक 7 मधील तरुणांनी आज मोठ्या उत्साहाने शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे. युवकांचा हा विश्वास आमच्यासाठी प्रेरणादायी असून आगामी पनवेल महापालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद अधिक सक्षम करण्यास मोठी मदत ठरणार आहे. संघटनेच्या कार्याला नवी उभारी देण्याचे काम या तरुणांनी केले असून आम्ही सर्वजण मिळून कळंबोलीच्या विकासासाठी झटणार आहोत.”
श्रीकांत फाळके
इच्छुक उमेदवार प्रभाग क्रमांक 7

संपादक : नितीन जाधव





