पनवेल येथे सभेत धनंजय मुंडेंवर जरांगे पुन्हा बरसले! खांदा कॉलनी येथे मराठा भवनाचे उद्घाटन.
पनवेल येथे सभेत धनंजय मुंडेंवर जरांगे पुन्हा बरसले!खांदा कॉलनी येथे मराठा भवनाचे उद्घाटन.
पनवेल दि.7( प्रतिनिधी )पनवेलच्या खांदा कॉलनीतील मराठा भवनच्या उद्घाटन कार्यक्रमात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. मला मारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी मुंडेंनी दिली, अशी कबुली ताब्यात घेतलेल्या आरोपींनी पोलिसांना दिली आहे. त्यांच्या कॉल रेकॉर्डिंगपासून त्या रात्री आरोपी आणि मुंडे यांच्यात झालेल्या संभाषणाचे पुरावेही पोलिसांकडे आहेत.जरांगे-पाटील यांनी जालना पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
आपल्या भाषणामध्ये त्यांनी मुंडेंना लक्ष केले इतके पुरावे असताना जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय मुंडे यांना चौकशीसाठी का बोलवत नाहीत अटक का केली जात नाही राज्य सरकार त्यांना पाठीशी का घालत आहे गृहमंत्री या प्रकरणी गप्प का असा थेट सवाल त्यांनी सभेतून केला. जरांगे-पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि राजकीय दबावांवर भाष्य करताना पुढे म्हटले सत्ता बदलली की मुळासकट सगळे बाहेर काढू. काँग्रेसला वाटले नव्हते की ते सत्तेतून बाहेर जातील, आणि भाजपलाही असे वाटले नव्हते की आम्ही त्यांना सत्तेतून खाली आणू. पुरावे असतानाही संबंधितांना पाठीशी घातले जाते. त्यामुळे मराठ्यांसमोर कोणाची सत्ता टिकणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
■पंकजा मुंडे यांच्यावरही टीका
जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही त्यांनी कठोर टीका केली.जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्या सह्या नसतानाही 70 कोटी रुपये वाटण्यात आले. न्यायालयाने त्या निर्णयाला स्थगिती दिली. हे राजकारण असल्याने आम्हाला न्यायालयात जावे लागले. असेही ते म्हणाले.
■मराठ्यांच्या विरोधकांना निवडणुकीत धडा शिकवा मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना निवडणुकीत पराभूत करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. तसेच मुंबईतील आंदोलनादरम्यान पनवेल-खांदा परिसरातील मराठा बांधवांनी दिलेल्या मदतीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आंदोलनातील अनेक किस्से, संघर्षाच्या आठवणी त्यांनी सभेतून उपस्थितांसोबत शेअर करत पुन्हा एकदा मुंबई आंदोलनाची आठवण करून दिली.

संपादक : नितीन जाधव





