उद्योगराजकीय

अमर ठाकूर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आ.प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन


अमर ठाकूर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन     आ. प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन, प्रीतम म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती                                                         कळंबोली ( प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे रोडपाली येथील युवा नेते अमर प्रभाकर ठाकूर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोमवार, दि. १५ डिसेंबर रोजी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या शुभहस्ते पार पडले. या उद्घाटन समारंभास राजकीय, सामाजिक आणि नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे माजी नगरसेवक गणेश कडू, नितीन पाटील, अमर पाटील, अशोक मोटे यांच्यासह अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, शुभचिंतक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी अमर ठाकूर यांनी आजपर्यंत केलेल्या समाजसेवेचे विशेष कौतुक केले. सातत्याने सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी झटणारे अमर ठाकूर हे कार्यकर्त्यांमध्ये वेगळे स्थान निर्माण करणारे नेतृत्व असल्याचे त्यांनी नमूद केले. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे मार्गी लागतील आणि लोकसेवेचे कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच अमर ठाकूर यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पालिका स्थापन झाल्यापासून प्रभागामध्ये सातत्याने जनसेवा करणारे अमर ठाकूर यंदा प्रभाग क्रमांक सातमधून भारतीय जनता पार्टीकडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत. भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने सहभाग नोंदवणारे अमर ठाकूर हे संघटनात्मक बांधणीसाठी ओळखले जातात.माऊली प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून पक्षाची भूमिका आणि सामाजिक संदेश सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य अमर ठाकूर व त्यांच्या पत्नी मनाली ठाकूर यांनी केले आहे. जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनामुळे रोडपाली व परिसरातील नागरिकांसाठी एक विश्वासाचे केंद्र उभे राहिले असून, आगामी काळात नागरिकसेवेसाठी हे कार्यालय महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *