कळंबोली शिवसेना शहराध्यक्ष तुकाराम सरक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
कळंबोली शिवसेना शहराध्यक्ष तुकाराम सरक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
कळंबोली : कळंबोली शिवसेना शहराध्यक्ष तथा कळंबोलीतील लोकप्रिय युवा नेतृत्व तुकाराम सर यांचा वाढदिवस कळंबोली शहरात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. वाहतूकदार नेते, युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळख असलेल्या तुकाराम सरक यांच्याविषयी कळंबोलीतील नागरिकांमध्ये विशेष आपुलकी असून त्याचा प्रत्यय या वाढदिवसानिमित्त पाहायला मिळाला.
कळंबोली शहरातील शेकडो गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी, हितचिंतक, मित्रपरिवार, शिवसैनिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी तुकाराम सरक यांना शुभेच्छांचा वर्षाव केला. फुलांचे हार, केक कापणे तसेच आनंदोत्सवाच्या वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.
तुकाराम सरक यांनी शहराच्या विकासासाठी, युवकांच्या प्रश्नांसाठी तसेच वाहतूकदारांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना. एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे तसेच शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी त्यांना खास शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी बोलताना अनेक मान्यवरांनी तुकाराम सरक यांच्या नेतृत्वगुणांचे, सामाजिक बांधिलकीचे आणि संघटन कौशल्याचे कौतुक केले. “कळंबोलीच्या विकासात तुकाराम सरक यांचे योगदान मोलाचे असून पुढील काळातही त्यांच्याकडून भरीव कार्य अपेक्षित आहे,” असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
एकूणच, जनसामान्यांच्या प्रेमातून साकारलेला हा वाढदिवस सोहळा कळंबोली शहरात चर्चेचा विषय ठरला.

संपादक : नितीन जाधव





