पनवेलमध्ये शिवसेनेला बळकटी; उत्तर भारतीय सेलच्या पुढाकाराने असंख्य कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश
पनवेलमध्ये शिवसेनेला बळकटी; उत्तर भारतीय सेलच्या पुढाकाराने असंख्य कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश
पनवेल, ( प्रतिनिधी )शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि त्यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन पनवेल तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. शिवसेना उत्तर भारतीय सेल पनवेल तालुका प्रमुख चंद्र प्रताप प्रजापती (सी. पी.) यांच्या विशेष प्रयत्नातून हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी विकास शर्मा, अभिनेता सिंह, रंजीत सिंह, गोवर्धन प्रचारपाते, राजनाथ पासवान, आशिष राजपुत्र, अभिषेक राजपुत, विरेन्द्र साह, आकाश सिंह, बाबू चौहान, विन्दु प्रजापति, प्रयोग शाह, अरविन्द पॉल, सत्यनारायण शर्मा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.या पक्षप्रवेशामुळे पनवेल तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली असून, विशेषतः उत्तर भारतीय समाजामध्ये पक्षाची पकड वाढण्यास मदत होणार आहे. पक्षप्रवेशावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत, शिवसेनेची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शिवसेना ही सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारी संघटना असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाभिमुख निर्णय घेतले जात आहेत. या धोरणांवर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते शिवसेनेत सहभागी होत आहेत.या पक्षप्रवेश कार्यक्रमास शिवसेनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात व जल्लोषाच्या वातावरणात पार पडला.

संपादक : नितीन जाधव





