प्रभाग ८ मध्ये रामदास शेवाळे दोन पाऊल पुढे; विकासाच्या व्हिजनवर महायुतीचा झंझावाती प्रचार
प्रभाग ८ मध्ये रामदास शेवाळे दोन पाऊल पुढे; विकासाच्या व्हिजनवर महायुतीचा झंझावाती प्रचार
पनवेल (प्रतिनिधी )
प्रभाग क्रमांक आठ मधून भारतीय जनता पार्टी व शिवसेना महायुतीची लढत रंगात आली असून महायुतीच्या प्रचाराने संपूर्ण परिसरात वेग घेतला आहे. शिवसेनेचे उमेदवार रामदास शेवाळे, सायली सरक तसेच भारतीय जनता पार्टीचे बबन मुकादम व बायजा बारगजे हे चारही उमेदवार विजयाच्या निर्धाराने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
प्रभाग आठमध्ये महायुतीकडून जोरदार डोअर-टू-डोअर प्रचार सुरू असून मतदारांशी थेट संवाद साधत विकासाचा अजेंडा मांडला जात आहे. विशेषतः शिवसेनेचे रामदास शेवाळे हे विकासाचे ठोस व्हिजन घेऊन प्रचारात दोन पावले पुढे असल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले रामदास शेवाळे यांचा 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण या सूत्रानुसार प्रचार सुरू आहे.
नागरिकांच्या मूलभूत सुविधा, पायाभूत विकासकामे आणि प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीवर भर देत ते मतदारांना विश्वासात घेत आहेत.
रामदास शेवाळे यांना प्रभाग क्रमांक आठमधून मिळणारा वाढता पाठिंबा लक्षात घेता, महायुतीची ही लढत तुलनेने सोपी ठरेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. महायुतीच्या एकसंघ प्रचारामुळे विरोधकांवर दबाव वाढताना दिसत असून प्रभाग आठमध्ये विजयाचा आत्मविश्वास महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टपणे जाणवत आहे.

संपादक : नितीन जाधव





