प्रभुदास भोईर अखिल भारतीय माथाडी कामगार संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी; नवी मुंबई विमानतळावरील कामगारांच्या समस्या सुटणार
प्रभुदास भोईर अखिल भारतीय माथाडी कामगार संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी; नवी मुंबई विमानतळावरील कामगारांच्या समस्या सुटणार
पनवेल ता.30(बातमीदार)अखिल भारतीय माथाडी कामगार संघटनात सेच अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या वतीने प्रभुदास भोईर यांची अनुक्रमे जिल्हाध्यक्ष रायगड व “सचिव महाराष्ट्र (नवी मुंबई)” या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून भोईर यांच्या निवडीमुळे कामगार चळवळीला नवे बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. संघटनेचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या पत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. या पत्रात भोईर यांच्यावर संघटनेच्या सदस्यांचे प्रतिनिधित्व करण्याची तसेच कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सक्रियपणे लढा देण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, अखिल भारतीय माथाडी कामगार संघटनेच्या वतीनेही प्रभुदास भोईर यांना रायगड जिल्हा अध्यक्ष पदासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम आणि संघटित कार्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
भोईर यांच्या नियुक्तीमुळे कामगार संघटनांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या पुढील कार्यकाळात कामगारांच्या हक्कांसाठी ठोस निर्णय आणि प्रभावी कामगिरी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रभाकर भोईर यांच्या निवडीमुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कामगारांच्या समस्या सुटणार आहेत अशी अपेक्षा कामगारांनी केली आहे. प्रभाकर भोईर यांना आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, उरणचे आमदार महेश बालदी यांनी शुभेच्छा दिल्या.

संपादक : नितीन जाधव





