TERMS & CONDITIONSराजकीय

ठाणे शहर प्रभारी म्हणून विक्रांत पाटील यांची निवड


भारतीय जनता पार्टी कडून जिल्हा प्रभारी नियुक्त्या; ठाणे शहरासाठी विक्रांत पाटील यांची निवड

पनवेल (प्रतिनिधी )महाराष्ट्रातील आगामी संघटनात्मक उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने विविध जिल्ह्यांसाठी ‘जिल्हा प्रभारी’ नियुक्ती जाहीर केली असून ठाणे शहराची जबाबदारी आमदार विक्रांत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

पक्षाच्या अधिकृत पत्रकानुसार, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार राज्यभरातील विविध कार्यक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी काळात पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी तसेच विविध अभियानांचे नियोजन करण्यासाठी जिल्हा प्रभारी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

या अंतर्गत पं. दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान, एसआयआर अभियान, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसारख्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच २६ एप्रिल रोजी होणाऱ्या ‘मन की बात’ कार्यक्रमासाठीही विशेष तयारी केली जाणार आहे.

ठाणे शहरासाठी आमदार विक्रांत पाटील यांची निवड झाल्याने स्थानिक पातळीवर पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

 


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *