डीडीएसआरकडून कोणतीही फसवणूक नाही” – खासदार श्रीरंग बारणे यांचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण
“डीडीएसआरकडून कोणतीही फसवणूक नाही” – खासदार श्रीरंग बारणे यांचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण
पनवेल / प्रतिनिधी :
नवी मुंबई–पनवेल परिसरातील गृहनिर्माण प्रकल्पांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मावळचे खासदार Shrirang Barne यांनी डीडीएसआर समूहाच्या बाजूने स्पष्ट भूमिका मांडली आहे. खारघर येथे खासदारांसाठी उभारण्यात येत असलेल्या ‘मातोश्री’ सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया देत डीडीएसआरने कोणत्याही प्रकारची फसवणूक, दिरंगाई किंवा आर्थिक गैरव्यवहार केलेला नसल्याचे ठामपणे सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून डीडीएसआर समूहावर करण्यात येत असलेल्या आरोपांमुळे गृहनिर्माण क्षेत्रात संभ्रम निर्माण झाला असताना बारणे यांनी हा व्हिडिओ संदेश जारी केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, डीडीएसआर बिल्डरच्या कामकाजात कुठल्याही प्रकारची अनियमितता आढळलेली नाही. “कंपनीने सर्व प्रकल्प नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने राबवले आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
बारणे यांनी पुढे सांगितले की, डीडीएसआर ही कंपनी मराठी उद्योजकांनी मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने उभी केली आहे. अशा संस्थेवर केले जाणारे आरोप हे निराधार असून त्यामागे अन्य हेतू असू शकतात, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. “राहुल हजारे आणि त्यांच्या टीमने प्रामाणिकपणे काम करत अनेक कुटुंबांना घरे उपलब्ध करून दिली आहेत,” असेही त्यांनी म्हटले.
तसेच, कोणत्याही प्रकारची चौकशी झाल्यास सत्य बाहेर येईल आणि कंपनीवरील सर्व आरोप खोटे ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या व्हिडिओमुळे डीडीएसआर समूहाला राजकीय पातळीवरही पाठबळ मिळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

संपादक : नितीन जाधव





