राजकीय

कळंबोलीत शिवसेनेला बळकटी; प्रभाग क्रमांक ८ मधून असंख्य कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश


प्रेम डांगे ( प्रतिनिधी) शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख  रामदास शेवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना कळंबोली शहरप्रमुख तुकाराम सरक यांच्या प्रयत्नातून कळंबोली येथील प्रभाग क्रमांक ८ मधून असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. होऊ घातलेल्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, यामुळे कळंबोली परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार आहे. या जाहीर पक्षप्रवेशात अंकित सरगर, दीपक चव्हाण, राहुल राजपूत, नयन पवार, रोहन शिंदे, दादू मोहिते, कृष्णा पवार, अमन जानकर, चंचल सिन्हा, अनिकेत जानकर, शुभम ठोंबरे, अभिजीत शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमास शिवसेना महिला शहरप्रमुख ज्योतीताई पाटील, विभागप्रमुख निलेश दिसले, पंकज सूर्यवंशी, सुकुमार नलावडे, तुषार जाधव, माधव येरोळे, राजसिंग कापसे, संतोष जाधव, सुरज करणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.                                                               पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने हा पक्षप्रवेश शिवसेनेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, कळंबोली परिसरात पक्षाचा जनाधार अधिक भक्कम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *