अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्रप्र तिनिधित्व द्याव.
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्रप्र तिनिधित्व द्यावे; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची पनवेल मध्ये मागणी
पनवेल,ता.27(बातमीदार) आरक्षण विधेयकाची तातडीने अंमलबजावणी करावी तसेच अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणेच ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी पनवेल येथील पत्रकार परिषदेत केली.
केंद्र सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या की, 2023 मध्ये मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक अद्याप लागू करण्यात आलेले नाही. “सरकारला खरोखरच महिलांना न्याय द्यायचा असता, तर 2024 पासून हे विधेयक लागू झाले असते. मात्र ते डिलिमिटेशनशी जोडून राजकीय फायद्यासाठी वापरले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. 2026 ची जनगणना तातडीने करून त्यानुसार आरक्षण लागू करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
याच वेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत विमानप्रवासातील अनुभव सांगितला. तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावरही टीका करत महिलांच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घेण्याचे आव्हान दिले.
पत्रकार परिषदेनंतर बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांच्या विधानाच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यांच्या छायाचित्राला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला व “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

संपादक : नितीन जाधव





