प्रभाग १० मधून “वाहिनीसाहेब” वर्षा किरण नागरगोजे निवडणूक रिंगणात
प्रभाग १० मधून “वाहिनीसाहेब” वर्षा किरण नागरगोजे निवडणूक रिंगणात; कॉलनी फोरमकडून उमेदवारी कळंबोली (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मधून सौभाग्यवती वर्षा किरण नागरगोजे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली असून, त्या कॉलनी फोरमच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. कॉलनी फोरम हा महाविकास आघाडीशी संलग्न असल्याने त्यांच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. वर्षा नागरगोजे या सकल मराठा समाज कळंबोलीचे शहर सचिव तसेच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किरण विठ्ठल नागरगोजे यांच्या सुविद्य पत्नी आहेत. सकल मराठा समाजाच्या विविध कार्यक्रमांमध्ये वर्षा नागरगोजे या आपल्या पतीसोबत खांद्याला खांदा लावून सक्रियपणे समाजकार्य करताना दिसल्या आहेत. त्यामुळे त्या समाजात परिचित व विश्वासार्ह चेहरा म्हणून ओळखल्या जात आहेत. नवतरुण, सुशिक्षित आणि सामाजिक भान असलेला चेहरा म्हणून वर्षा नागरगोजे यांच्याकडे पाहिले जात असून, समाजकार्याची आवड व जनतेशी थेट संवाद साधण्याची त्यांची भूमिका लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे कळंबोली परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये हालचाल निर्माण झाली असून, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.दरम्यान, किरण नागरगोजे यांचा प्रभागात दांडगा जनसंपर्क असून, मित्रमंडळ व कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे त्यांच्या पाठीशी आहे. या मजबूत पाठबळाच्या जोरावर आगामी पनवेल महानगरपालिका निवडणूक तुलनेने सोपी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.प्रभाग १० मधून वर्षा नागरगोजे यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात नव्या चेहऱ्याचा प्रवेश होत असून, महिला नेतृत्वाला चालना मिळण्याचीही चर्चा परिसरात सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीत मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादक : नितीन जाधव





