कळंबोली प्रभाग १० मध्ये महायुतीचा जोशपूर्ण प्रचार; आमदार प्रशांत ठाकूरांचा नागरिकांशी थेट संवाद
कळंबोली प्रभाग १० मध्ये महायुतीचा जोशपूर्ण प्रचार; आमदार प्रशांत ठाकूरांचा नागरिकांशी थेट संवाद
कळंबोली येथील प्रभाग क्रमांक १० मध्ये महायुतीच्या वतीने जोशपूर्ण प्रचार दौरा पार पडला. या प्रचारात आमदार प्रशांत ठाकूर यांनी विशेष उपस्थिती लावत नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी महायुतीच्या उमेदवारांची विकासात्मक भूमिका, आतापर्यंत केलेली कामे तसेच भविष्यातील विकास आराखडा मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आला.
प्रभाग १० मधील महायुतीचे उमेदवार विजय खानावकर, रवींद्र भगत, सरस्वती काथारा आणि मोनिका महानवर यांच्या प्रचारासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी चारही उमेदवारांसमवेत घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटी घेतल्या. पदयात्रा न करता थेट नागरिकांच्या घरांमध्ये संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेण्यात आल्या.
या प्रभागामध्ये महाविकास आघाडी व महायुती यांच्यात तुल्यबळ लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय खानावकर यांचे पारडे या प्रभागात जड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने महायुतीचे मनोबल अधिक वाढल्याचे चित्र दिसून आले.

संपादक : नितीन जाधव





