नगरसेवक रामदास शेवाळे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट
शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट
पनवेल ता.18(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेने आपले खाते उघडत महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे तसेच शहरप्रमुख तुकाराम सरक यांच्या पत्नी सायली सरक यांनी घवघवीत विजय मिळवत पनवेल महानगरपालिकेत शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आणले आहेत.नवनिर्वाचित नगरसेवकांच्या या यशामुळे पनवेल महानगरपालिकेत शिवसेनेला भक्कम प्रतिनिधित्व मिळाले असून, प्रभागातील दांडगा जनसंपर्क आणि नागरिकांशी असलेली थेट नाळ यांच्या बळावर दोन्ही नगरसेवक प्रभागातील विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ता. १८ रोजी नवनिर्वाचित नगरसेवक रामदास शेवाळे व सायली सरक यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नगरसेवकांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पनवेलच्या विकासासाठी शिवसेनेचे नगरसेवक सकारात्मक आणि प्रभावी काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी श्रीनिवास क्षीरसागर,निलेश दिसले,महेश गोडसे, श्रीकांत फाळके, बालाजी खोडेवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. एकूणच, शिवसेनेच्या या विजयामुळे पनवेलच्या राजकारणात नवी दिशा मिळाली असून, नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख कामकाज करण्याचा निर्धार नवनिर्वाचित नगरसेवकांनी व्यक्त केला आहे.
कोट :
“जनतेच्या विश्वासाने नगरसेवक झाल्यानंतर माझे गुरु व नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊन आशीर्वाद व शुभेच्छा मिळाल्या. हीच ऊर्जा पनवेलच्या विकासासाठी वापरणार.” रामदास शेवाळे, नगरसेवक, पनवेल महानगरपालिका

संपादक : नितीन जाधव





