उद्योगराजकीय

प्रभाग सात मध्ये मालमत्ता कर, प्रदूषण व अवजड वाहन पार्किंगचे प्रश्न ऐरणीवर; महाविकास आघाडीचा आक्रमक प्रचार


प्रभाग सात मध्ये मालमत्ता कर, प्रदूषण व अवजड वाहन पार्किंगचे प्रश्न ऐरणीवर; महाविकास आघाडीचा आक्रमक प्रचार

पनवेल (प्रतिनिधी )

पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सात मध्ये मालमत्ता कराची वाढ, वाढते प्रदूषण तसेच अवजड वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक व सुरक्षिततेच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करत महाविकास आघाडीने प्रचाराला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार सुदाम पाटील, वीणा पाटील, प्रदीप ठाकूर आणि विद्या गायकवाड यांनी घरभेटी, पदयात्रा व नागरिकांशी थेट संवाद साधत या मुद्द्यांना प्राधान्य दिले आहे.

नागरिकांवर वाढत्या मालमत्ता कराचा आर्थिक बोजा पडत असून त्यात सुसूत्रता व पारदर्शकता आणण्याची गरज असल्याचे उमेदवारांनी सांगितले. तसेच औद्योगिक व वाहतूक वाढीमुळे परिसरात प्रदूषणाचा स्तर वाढत असल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. प्रभागातील मुख्य रस्त्यांवर व निवासी भागात अवजड वाहनांची बेकायदा पार्किंग होत असल्याने अपघातांचा धोका वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली.

निवडून आल्यास मालमत्ता कर पुनरावलोकन, प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना तसेच अवजड वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था व कडक अंमलबजावणी करण्यात येईल, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. नागरिकांनीही या प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद देत बदलासाठी पाठिंबा दर्शवला आहे.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *