सामाजिक

शिवस्मारक व बहुउद्देशीय इमारतीच्या मागणीला नगरसेवकांचा पाठिंबा; सकल मराठा समाजाच्या कौटुंबिक मेळाव्यात पाठपुराव्याचे आश्वासन


शिवस्मारक व बहुउद्देशीय इमारतीच्या मागणीला नगरसेवकांचा पाठिंबा; सकल मराठा समाजाच्या कौटुंबिक मेळाव्यात पाठपुराव्याचे आश्वासन

पनवेल ता.15(प्रतिनिधी) सकल मराठा समाज, कळंबोली यांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या कौटुंबिक मेळाव्यात महापौर-उपमहापौर व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार सोहळा शनिवार ता. 14 रोजी सुधागड हायस्कूल कळंबोली या ठिकाणी साजरा करण्यात आला. यावेळी मराठा समाजाच्या विविध मागण्यांचा ठराव मांडण्यात आला. समाजातर्फे कळंबोली परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य शिवस्मारक उभारावे तसेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी बहुउद्देशीय इमारत, अभ्यासिका व वाचनालय उभारण्यात यावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

या मागणीला उपस्थित सर्व नगरसेवकांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अभ्यासिका-वाचनालय अत्यंत गरजेचे असून समाजाच्या सांस्कृतिक ओळखीकरिता शिवस्मारक उभारणी महत्त्वाची असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमास विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, बाळासाहेब पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, नगरसेवक रामदास शेवाळे, विजय खानावकर, बबन मुकादम, रवी भगत, सरस्वती काथारा, मोनिका महानवर, सायली सरक, मनाली ठाकूर, सोनल ढमाले पाटील यांच्यासह रविनाथ पाटील, तुकाराम सरक, अमर ठाकूर, प्रकाश महानवर आदी मान्यवर उपस्थित होते. सकल मराठा समाज मंडळ कळंबोली चे अध्यक्ष नगरसेवक रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. समन्वयक अजय सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. रेखाताई शेवाळे, किरण नागरगोजे, प्रशांत कदम, स्नेहल बागल, रत्नमाला शिंदे, वर्षा नागरगोजे व अवधूत साळुंखे यांच्यासह समाजातील कार्यकर्त्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला कळंबोली मधील शेकडो मराठा कुटुंबांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम उत्साहात पार पडला असून मराठा समाजाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उन्नतीसाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

 


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *