TERMS & CONDITIONSसामाजिक

स्वरूप खरगे यांच्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे पनवेल मध्ये जिवंत झाला शिवकाळ.


स्वरूप खरगे यांच्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे पनवेल मध्ये जिवंत झाला शिवकाळ.

क्रांतिवीर फडके नाट्यगृहात शिवराज्याभिषेक सोहळ्याने पनवेल शिवमय

पनवेल दि. 19 ( प्रतिनिधी)शिवजयंतीनिमित्त पनवेल महानगरपालिकाच्या मालमत्ता विभागातर्फे क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे भव्य आणि नेत्रदीपक शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सभागृह खचाखच भरले होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर रंगमंचावर सादर करण्यात आलेल्या राज्याभिषेक सोहळ्याच्या नाट्यमय सादरीकरणाने उपस्थितांना ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार असल्याची अनुभूती दिली. आकर्षक नेपथ्य, पारंपरिक वेशभूषा, प्रभावी प्रकाशयोजना आणि दमदार संवादफेक यामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.

या सोहळ्यात उपायुक्त स्वरूप खरगे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका विशेष ठरली. त्यांच्या राजस देहबोली, करारी नजर आणि प्रभावी अभिनयामुळे छत्रपतींची प्रतिमा जिवंत झाल्याचा भास निर्माण झाला. त्यांच्या प्रवेशाला आणि संवादांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

शिवजयंतीनिमित्त महापालिकेने आयोजित केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण पनवेल शहरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपतींच्या कार्याचा गौरव केला आणि कार्यक्रम यशस्वी ठरविला.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *