क्राईम

नेरुळ पोलिसांची मोठी कारवाई : मोटारसायकल व रिक्षा चोरी प्रकरणातील दोन सराईत आरोपी अटकेत


नेरुळ पोलिसांची मोठी कारवाई : मोटारसायकल व रिक्षा चोरी प्रकरणातील दोन सराईत आरोपी अटकेत

नवी मुंबई :

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत असलेल्या मोटारसायकल व रिक्षा चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी नेरुळ पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या मोटारसायकली आणि रिक्षा जप्त करण्यात आल्या असून सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त. मिलिंद भारंबे, अमित काळे सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. मोटारसायकल व रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शुभम हर्षल कांबळे (वय २५ वर्षे), रा. कोपरखैरणे व शुभंकर राघव प्रसाद (वय २४ वर्षे), रा. घणसोली, नवी मुंबई यांचा समावेश आहे. आरोपींकडून चोरीस गेलेल्या ९ मोटारसायकली आणि ५ रिक्षा जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या आरोपींवर नेरुळसह नवी मुंबई परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये वाहन चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या तपासात आरोपींनी वाहन चोरी करून त्यांची विक्री करण्याचा प्रकार केल्याचे उघड झाले आहे.

नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रकरणी पुढील तपास नेरुळ पोलीस करत आहेत.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *