TERMS & CONDITIONSक्राईम

नवी मुंबई गुन्हे शाखेची धडक कारवाई : २४ तासांत छडा ३ आरोपी अटकेत


नवी मुंबई गुन्हे शाखेची धडक कारवाई : २४ तासांत ३ आरोपी अटकेत; ३६ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त

Veeje नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने घरफोडीच्या गुन्ह्यात तातडीची कारवाई करत अवघ्या २४ तासांत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ३० तोळे वजनाचे अंदाजे ३६ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

कळंबोली येथील पृथ्वी बिल्डिंगमधील रहिवासी रूबी संतोष पाटील (वय ४९) यांच्या घरात १ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ३० तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३६ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३८० व ४५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे पवन रोहितस जाधव (वय २५), सुमित रोहितस जाधव (वय २२) आणि शिवाजी जयन राठोड (वय २३) या तिघांना कल्याण परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी घरफोडीची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले अंदाजे ३० ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले.

सदर आरोपींना न्यायालयाने १३ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकरे व पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *