उद्योग

गॅस टंचाईतही फेमस लपेट्याची चव कायम; साईकृपा देतेय चुलीवरचा फेमस लपेटा


गॅस टंचाईतही साईकृपा च्या फेमस  लपेट्याची चव कायम; शिरढोणच्या साईकृपा हॉटेलची ग्राहकांना दिलासा देणारी सेवा

 

पनवेल :व्यावसायिक गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर अनेक हॉटेल व्यवसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत असताना पनवेल–गोवा महामार्गावरील शिरढोण येथील सुप्रसिद्ध साईकृपा हॉटेलने ग्राहकांची गैरसोय होऊ न देता चुलीवरील लपेटा देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे खवय्यांना पूर्वीप्रमाणेच लपेट्याची अस्सल चव चाखता येत असून हॉटेल व्यवस्थापनाने नुकसान सोसत व्यवसाय सुरळीत ठेवण्यात यश मिळवले आहे.

 

महाराष्ट्रभर फेमस लपेटा या खास पदार्थासाठी प्रसिद्ध असलेले साईकृपा हॉटेल हे शिरढोण परिसरातील एक आकर्षण मानले जाते. महाराष्ट्राला लपेट्याची चटक लावणारे वाकडीकर कुटुंबीयांचे हे हॉटेल अनेक वर्षांपासून खवय्यांच्या पसंतीस उतरले आहे. दररोज दूरदूरवरून हजारो ग्राहक येथे येऊन लपेट्याचा आस्वाद घेत असतात. भव्य पार्किंग व्यवस्था, प्रशस्त बैठक व्यवस्था आणि प्रत्येक ग्राहकावर लक्ष ठेवणारा सजग कर्मचारीवर्ग यामुळे या हॉटेलची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

 

सध्या गॅस टंचाईच्या परिस्थितीत अनेक हॉटेल व्यवसायांवर परिणाम झाला असताना साईकृपा हॉटेलने चुलीवर लपेटा तयार करून ग्राहकांना सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ग्राहकांना कोणतीही अडचण न होता हॉटेलची सेवा अखंड सुरू ठेवण्यात वाकडीकर बंधूंना यश आले आहे.

 

चुलीवरील पदार्थ म्हणून फसवणूक करणाऱ्या भाऊगर्दीमध्ये साईकृपा हॉटेलने आपली खरी ओळख आणि परंपरा जपली आहे. आजी-आजोबांचा वारसा आणि वडील जनार्दन वाकडीकर यांनी जपलेली परंपरा आता आतिश व जयेश वाकडीकर हे दोन तरुण व्यावसायिक समर्थपणे पुढे नेत आहेत.

 

दरम्यान, ग्राहकांनी पूर्वीप्रमाणेच साईकृपा हॉटेलला भेट देऊन चुलीवरील अस्सल फेमस लपेट्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन वाकडीकर बंधूंनी समाजमाध्यमांद्वारे केले आहे. त्यामुळे गॅस टंचाईच्या काळातही चुलीवरील लपेट्याची चव कायम ठेवणाऱ्या साईकृपा हॉटेलचे सर्वत्र कौतुक होत आहे.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *