क्राईम

कळंबोलीत ‘ऑल आऊट’ व कोंबिंग ऑपरेशन; ८ गुन्हे दाखल, ४३ पोलीसांचा सहभाग


कळंबोलीत ‘ऑल आऊट’ व कोंबिंग ऑपरेशन; ८ गुन्हे दाखल, ४३ पोलीसांचा सहभाग

वसंत जाधव 

कळंबोली ( प्रतिनिधी )कळंबोली पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ‘ऑल आऊट’ व कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. हे विशेष ऑपरेशन मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०३ व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, खारघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

या व्यापक कारवाईदरम्यान विविध कायद्यांअंतर्गत गुन्हे नोंदवून एकूण ८ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. अमली पदार्थांविरोधात NDPS कलम 8(C), 27 अन्वये २ कारवाया करण्यात आल्या. तसेच भारतीय हत्यार कायद्यानुसार १ कारवाई करून एक कोयता जप्त करण्यात आला. दारूबंदी अधिनियमांतर्गत २ प्रकरणे नोंदविण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणी धोकादायक पद्धतीने वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर BNS कलम 285/287 अन्वये ३ कारवाया करण्यात आल्या. तसेच गुटका व तंबाखूजन्य पदार्थ विक्री व वापरावर नियंत्रणासाठी COTPA अंतर्गत ५ कारवाया करण्यात आल्या.

या ऑपरेशनदरम्यान १ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. नाकाबंदीवेळी १८५ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३४ वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करून एकूण ३४,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मो वा का १८५ अंतर्गत २ प्रकरणे नोंदविण्यात आली.

याशिवाय, ५ बेवारंट वॉरंटची बजावणी करण्यात आली असून १० समन्सही बजावण्यात आले. कोंबिंग ऑपरेशनदरम्यान १७ अभिलेखावरील आरोपींची पडताळणी करण्यात आली असता ५ आरोपी मिळून आले. तसेच ३ लॉजची तपासणी करण्यात आली.

या संपूर्ण ऑपरेशनमध्ये १० अधिकारी व ४३ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

“कळंबोली परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी अशा प्रकारचे ऑल आऊट व कोंबिंग ऑपरेशन नियमितपणे राबविण्यात येणार आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करत नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येत आहे.

राजेंद्र कोते

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळंबोली पोलीस ठाणे


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *