उद्योग

नवीन पनवेल प्रभाग 16 मधील शेकडो युवकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश       


नवीन पनवेल प्रभाग 16 मधील शेकडो युवकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश                        नवीन पनवेल( वार्ताहर) शिवसेना मुख्य नेते तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या उपस्थितीत नवीन पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे (बिनधास्त) यांनी केले, तर नवीन पनवेलमधील शिवसैनिक अमोल हाटे यांच्या प्रयत्नातून हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. प्रभाग क्रमांक 16 मधून युवा समाजसेवक अमोल हाटे, गिरीधर तांबे, अतुल भिंगारदिवे, सुनील कांबळे, विशाल बनसोडे, प्रणित साळवे, उत्तम पवार, बाळा पाटील, मनोज पाटील, विनोद सुरवाडे, भूषण जाधव, अजिंक्य पगारे, विशाल अवचार्मल, संजय कांबळे, सुदर्शन हाटे, सोनू गायकवाड, महेंद्र भालेराव, सागर शिंदे, मनोज पाटील, दर्शन काळे, नागेश तांबे आणि महेंद्र पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. या मोठ्या प्रमाणातील पक्षप्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवसेना अधिक मजबूत होत असून आगामी राजकीय घडामोडींमध्ये या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *