उद्योग

राष्ट्रीय सिनिअर तायक्वांदो स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील यांची पंच प्रमुखपदी निवड   


४१ वी राष्ट्रीय सिनिअर तायक्वांदो स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील यांची पंच प्रमुखपदी निवड                     पनवेल (प्रतिनिधी)४१ वी राष्ट्रीय सिनिअर तायक्वांदो स्पर्धा ११ ते १४ डिसेंबर २०२५ दरम्यान जी.एम.सी. बालायोगी इनडोअर स्टेडियम, हैदराबाद येथे होणार असून या स्पर्धेसाठी रायगडचे सुपूत्र आणि आंतरराष्ट्रीय तायक्वांदो पंच सुभाष पाटील यांची पंच प्रमुख म्हणून निवड झाली आहे. ७ वी डिग्री ब्लॅक बेल्ट धारक पाटील यांनी दक्षिण कोरिया, इजराइल, स्कॉटलंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांसह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच आणि कोच म्हणून योगदान दिले आहे. नुकताच दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय रेफरी रिफ्रेशर सेमिनार करून त्यांनी नवे नियम आत्मसात केले आहेत. हैदराबादमध्ये आयोजित होणाऱ्या या स्पर्धेसाठी ते ११ डिसेंबर रोजी रवाना होत असून त्यांच्या निवडीबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, रायगड तायक्वांदो असोसिएशन तसेच आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील आणि परेश ठाकूर यांनी त्यांना विशेष शुभेच्छा दिल्या.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *