रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत भव्य रोजगार व मोफत कोर्सेस मेळावा
रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत भव्य रोजगार व मोफत कोर्सेस मेळावा
100 हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग; युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी
नवीन पनवेल : शिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार व मोफत कोर्सेस मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार, दिनांक 31 मे 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत कळंबोली येथील सेक्टर 1E मधील नवीन सुधागड शाळा हॉल येथे पार पडणार आहे.
या रोजगार मेळाव्यात नवी मुंबई परिसरातील 100 पेक्षा अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार असून विविध क्षेत्रांतील नोकरीच्या संधी युवकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच अनुभवी तज्ज्ञांकडून मोफत मार्गदर्शन व विविध कौशल्यविकास कोर्सेसची माहितीही देण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी हा मेळावा मोठी संधी ठरणार आहे.
आयोजक तन्मय रामदास शेवाळे यांनी परिसरातील शिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच आपल्या मित्र-मैत्रिणी व नातेवाईकांपर्यंत हा संदेश पोहोचवून अधिकाधिक युवकांना रोजगाराच्या प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
“संधी तुमच्या दारात आली आहे… आता फक्त एक पाऊल पुढे टाका,” असा प्रेरणादायी संदेश देत या मेळाव्याबाबत युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संपादक : नितीन जाधव





