सामाजिक

सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला प्रभुदास भोईर यांचा वाढदिवस


सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला प्रभुदास भोईर यांचा वाढदिवस

वाहतूक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल, ता. २२ (प्रतिनिधी) : अखिल भारतीय कामगार संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रभुदास भोईर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे वाढदिवसाला समाजोपयोगी स्वरूप प्राप्त झाले.

या वाढदिवसानिमित्त पनवेल मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रभुदास भोईर यांच्या सामाजिक, कामगार आणि वाहतूक क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत त्यांच्या हक्कांसाठी कार्यरत राहण्याबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील विविध घटकांना एकत्रित करून जनसेवेची परंपरा जपणारे कार्यकर्ते म्हणून प्रभुदास भोईर यांची ओळख असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अभिष्टचिंतन सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, वाहतूक संघटनेचे पदाधिकारी, कामगार प्रतिनिधी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी प्रभुदास भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांमुळे हा सोहळा केवळ वाढदिवसापुरता मर्यादित न राहता समाजसेवेचा संदेश देणारा ठरला. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *