सामाजिक

फलटणच्या शेतकऱ्याला मनाचा ‘मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया’ पुरस्कार! बोडकेवाडीचे हेमंत सस्ते यांना दिल्लीत सन्मान


फलटणच्या शेतकऱ्याला मनाचा ‘मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया’ पुरस्कार! बोडकेवाडीचे हेमंत सस्ते यांना दिल्लीत सन्मान

मुंबई ता. 9( वार्ताहर)फलटण तालुक्यातील बोडकेवाडी या छोट्या गावातील एक जिद्दी, कष्टाळू शेतकरी हेमंत सस्ते यांनी आपल्या परिश्रमांच्या जोरावर मोठी झेप घेतली आहे. त्यांच्या या कष्टाच्या जोरावर त्यांना भारतीय शेतीचे ऑस्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया पुरस्कार 2025’ ता. 9 रोजी दिल्ली येथील शानदार कार्यक्रमात केंद्रीय राज्य मंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या मुळे संपूर्ण फलटण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्वांमध्ये विशेष अधोरेखित ठरणारी त्यांची डाळिंब शेती त्यांनी ‘भगवा’ प्रजातीची उत्कृष्ट डाळिंबबाग फुलवली, दर्जेदार व निरोगी फळे पिकवली आणि लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत संपूर्ण परिसरात आदर्श निर्माण केला. दुष्काळी भागात डाळिंबासारखे ‘कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारे’ पीक यशस्वीपणे पिकवून, त्याचे दर्जेदार उत्पादन देशभर पोहोचवण्यातील त्यांच्या योगदानामुळेच त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या आई-वडिलांच्या मार्गदर्शनाने आणि कुटुंबीयांच्या खंबीर साथीनं त्यांनी शेतीला उद्योगाचे रूप दिले. बोडकेवाडी गावासह संपूर्ण फलटण तालुक्याचा मान उंचावली आहे. जिद्द, कष्ट, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाची जोड मिळाली की दुष्काळी जमिनीसुद्धा ‘समृद्धीसाठी सोन्याची शेतं’ फुलवू शकते याचा जिवंत उदाहरण म्हणजे हेमंत सस्ते. त्यांची डाळिंब शेती पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून अनेक शेतकरी त्यांच्या शेतीवर कृषी सहल काढतात. डाळिंब पिकाबरोबरच भगव्या जातीच्या निरोगी रोपांची निर्मितीही ते आपल्या बागेवर करतात त्यांनी बनवलेल्या रोपांना महाराष्ट्रभर मागणी असून डाळिंब फळा बरोबर रोपवाटिकेच्या व्यवसायात ही भरारी घेतली आहे. हेमंत सस्ते यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून परिसरातील युवा शेतकरी आधुनिक डाळिंब शेतीकडे वळला आहे.

 

प्रतिक्रिया

आज हा कृषी क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार स्वीकारताना मला प्रचंड आनंद होत आहे आणि याचा मला खूप अभिमान वाटतो.हा पुरस्कार स्वीकारणे हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे आणि मी त्याबद्दल खूप आभारी आहे.हा पुरस्कार केवळ माझा नसून, या पुरस्काराचा मानकरी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कष्टकरी आणि प्रामाणिक शेतकऱ्याला जातो. माझ्यासारख्या सामान्य “या पुरस्कारासाठी ‘KJ KRISHI JAGRAN ‘ आणि परीक्षक मंडळाचे मी ऋणी आहे, ज्यांनी माझ्या कामाची दखल घेतली.                                                          हेमंत धनाजी सस्ते                                              प्रगतशील शेतकरी फलटण


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *