कळंबोली कालभैरव मंदिरासमोरील फुटलेली जलवाहिनी दुरुस्त; मा. नगरसेवक विजय खानावकर यांच्या पाठपुराव्याने पाणीपुरवठा सुरळीत
कळंबोली कालभैरव मंदिरासमोरील फुटलेली जलवाहिनी दुरुस्त; मा. नगरसेवक विजय खानावकर यांच्या पाठपुराव्याने पाणीपुरवठा सुरळीत कळंबोली : कालभैरव मंदिरासमोरील मुख्य जलवाहिनी अचानक फुटल्याने परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा खंडित होण्याची वेळ आली होती. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन माजी नगरसेवक विजय खानावकर यांनी संबंधित विभागाशी तात्काळ संपर्क साधत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याची मागणी केली. खानावकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महापालिकेच्या जलपुरवठा विभागाने त्वरित मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री पाठवून दुरुस्तीचे काम सुरू केले. काही तासांच्या मेहनतीनंतर फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आणि पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. या जलद कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाल्याचे दिसून आले. पाणीपुरवठा खंडित राहिला असता निर्माण झालेल्या अडचणींपासून नागरिकांची सुटका झाली. नागरिकांनी वेळेवर लक्ष घालून समस्या सोडविल्याबद्दल माजी नगरसेवक विजय खानावकर यांचे आभार मानले.

संपादक : नितीन जाधव





