उद्योग

गोपाळ भगत यांचा अभिष्टचिंतन सोहळा! प्रभाग 10 मध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन   


गोपाळ भगत यांचा अभिष्टचिंतन सोहळा!

प्रभाग 10 मध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन                      माजी आमदार बाळाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती

कळंबोली,माजी नगरसेवक गोपाळ भगत यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा आणि वाढदिवसाचा कार्यक्रम कळंबोलीतील काळभैरव मंगल कार्यालयात दिमाखात पार पडला. प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिक, मित्रपरिवार, समर्थक आणि विविध पक्षांचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने सोहळ्याला उत्साही वातावरण लाभले. पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसाला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमाला माजी आमदार बाळाराम पाटील, शेकाप पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, समाजवादी पक्षाचे नेते अनिल नाईक, शेकापचे कामगार नेते प्रकाश म्हात्रे, शिवसेनेचे अरविंद कडव आदी मान्यवरांनी उपस्थिती लावून अभिष्टचिंतन सोहळ्यास शुभेच्छा दिल्या. गोपाळ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 10 मध्ये नव्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रभागातील नागरिकांनी त्यांच्या उमेदवारीच्या चर्चेचे स्वागत करत आनंद व्यक्त केला. नागरिकांच्या प्रश्नांना तत्परतेने हाताळण्यासाठी हे कार्यालय महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

■ सामाजिक उपक्रमांची रेलचेल                                       अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने दिवसभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.तळोजा येथील वृद्ध अनाथ आश्रमात फळ वाटप कळंबोलीतील विविध रुग्णालयांमध्ये फळांचे वितरण,अनाथ मुलांच्या शाळांमध्ये फळ वाटप,तरुणांसाठी आयोजित ‘महा रोजगार मेळावा’ला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तरुण पिढी व्यसनाधीन होण्याची कारणे व उपाय” या विषयावर गणेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.या उपक्रमांमुळे दिवसभर सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि सेवाभावाची भावना जागृत राहिली.

■आगामी निवडणुकीत विजयाचा आत्मविश्वास                      गोपाळ भगत हे प्रामाणिक, सर्वसमावेशक आणि जनतेशी नाळ जुळवणारे नेते म्हणून कळंबोलीत ओळखले जातात. नागरिकांच्या समस्यांवर मनापासून संवाद साधणे, विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे आणि कार्यात पारदर्शकता ठेवण्याची त्यांची शैली लोकांमध्ये लोकप्रिय आहे. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर व कार्यकर्त्यांनीही प्रभाग क्रमांक 10 मधील आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीत गोपाळ भगत मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *