उद्योग

वडाळे तलाव परिसरातील बाईक रायडर्सवर पोलिसांची धडक कारवाई; 14 मोठे सायलेंसर रोड रोलरखाली


वडाळे तलाव परिसरातील बाईक रायडर्सवर पोलिसांची धडक कारवाई; 14 मोठे सायलेंसर रोड रोलरखाली

पनवेल ता.11( बातमीदार) पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील वडाळे तलाव आणि व्ही. के. हायस्कूल परिसरात बाईक रायडर्स मोठ्या प्रमाणात स्टंट, अतिवेग आणि गोंधळ माजवत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार येत होत्या. स्थानिकांना होणारा त्रास, वाहतुकीत होणारा व्यत्यय आणि मोठ्या आवाजामुळे होणारा ध्वनीप्रदूषण लक्षात घेता पनवेल पोलिसांनी अखेर कडक पावले उचलली. ता.11 रोजी संध्याकाळी पनवेल शहर पोलीस ठाण्याने वडाळे तलाव परिसरात विशेष मोहीम राबवून बाईक रायडर्सवर धडक कारवाई केली. यावेळी ध्वनीप्रदूषण करणाऱ्या आणि अवैधरीत्या फेरबदल केलेल्या १४ सायलेंसर जप्त करण्यात आले. कारवाईचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी हे सायलेंसर थेट रोड रोलरखाली फिरवण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या आवाजाचे सायलेंसर लावून लोकांची झोपमोड करणे, ध्वनीप्रदूषण वाढवणे आणि रस्त्यावर धोकादायक स्टंट करणे कोणत्याही परिस्थितीत चालणार नाही, असा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला. या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अनेकांनी पोलिसांच्या तात्काळ प्रतिसादाचे स्वागत करत ही मोहीम नियमित चालू ठेवावी, अशी मागणीही केली.पनवेल पोलीस विभागाने पुढील काही दिवसांमध्ये अशा कारवाया शहरातील इतर संवेदनशील ठिकाणीही राबविण्याचे संकेत दिले आहेत.

 

 


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *