कामोठ्यात ‘विकास’च वारं घोंघावतंय; प्रभाग १३ मधून विकास घरत पुन्हा मैदानात
कामोठ्यात ‘विकास’च वारं घोंघावतंय; प्रभाग १३ मधून विकास घरत पुन्हा मैदानात
बातमी:
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामोठे प्रभाग क्रमांक १३ मध्ये विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी आला असून भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय उमेदवार विकास घरत पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 24×7 उपलब्ध असणारा, कायमस्वरूपी नगरसेवक म्हणून त्यांची ओळख असून नागरिकांशी थेट संपर्क राखणारा नेता म्हणून ते ओळखले जातात.
नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही समाजाशी नाळ तुटू न देता कामोठे व प्रभागातील नागरिकांच्या सतत सहवासात राहिल्यामुळे विकास घरत हे नाव नागरिकांच्या मनात घर करून बसले आहे. “विकास येतो विकास करायला,” असे मत कामोठेतील नागरिक व्यक्त करत आहेत.
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचे निकटवर्ती म्हणून ओळख असलेले विकास घरत यांच्यावर आमदारांनी टाकलेला विश्वास ते यावेळीही सार्थ ठरवतील, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतो. हातात झाडू घेऊन प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करणारा नगरसेवक अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली असून प्रभागातील विविध विकासकामांमुळे मतदारांचा त्यांच्यावर ठाम विश्वास आहे.

संपादक : नितीन जाधव





